Inconsumercomplaints.com » Real Estate » Review / complaint: Ravi Group - See how Consumer Court compelled Ravi Group directed to obtain O.C. and give Conveyance to Mira Road Society | News #22606

Ravi Group
See how Consumer Court compelled Ravi Group directed to obtain O.C. and give Conveyance to Mira Road Society

Consumer Court compelled Ravi Group directed to obtain CC and give Conveyance to Mira Road Society viz. Gaurav Enclave who are occupying flats since 1998-99. See the entire Court order!

But what is pity is that even after this order, the Ravi Group succesfully divided the Society members and make them fighting with each other instead of proceeding further for execution of the Court order!!!

Lesson: Better do not buy the flats from this builder!!!

The Court order:

तक्रार क्रमांक – 308

तक्रार दाखल दिनांक – 20/05

निकालपञ दिनांक – 02/02

कालावधी - 00 वर्ष 08महिने 13दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर

गौरव एन्‍क्‍लेव्‍ह सी.एच.एस

क्‍लस्‍टर - 3, मिरा-भायंदर रोड,

मिरा रोड(पु), जिल्‍हा-ठाणे... तक्रारदार

विरूध्‍द

रवी डेव्‍हलपर्स

लक्ष्‍मी पॅलेस, 76, मथुरादास रोड,

कांदिवली(पश्चिम), मुंबई 400 067... विरुध्‍दपक्ष

समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्‍यक्षा

श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

उपस्थितीः- त.‍क तर्फे वकिल राम पांडे

वि.प एकतर्फा

एकतर्फा आदेश

(पारित दिः 02/02)

मा. प्र. अध्‍यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार

1. सदरहु त‍क्रार गौरव एन्‍क्‍लेव्‍ह सी.एच.एस तर्फे श्री.सतीश कुमार सिंग यांनी रवी डेव्‍हलपर्स विरुध्‍द C.C, O.C व कन्‍व्‍हेयन्‍स करुन देण्‍यासाठी दाखल केली आहे.

2. तक्रारदार सोसायटीचे सदर विरुध्‍द पक्षकार हे डेव्‍हलपर आहेत. विरुध्‍द पक्षकार यांचा जागेच्‍या मालकाशी 02 मध्‍ये डेव्‍हलपरचा करारनामा नोंदणीकृत आहे. विरुध्‍द पक्षकार यांनी सदर सोसायटी सर्वे नं. 72/2, 73/1, 2, 3, 4, 74/1, 2, 79/1, 3, 4, 75/1 जीसीसी जवळ मिरा भायंदर रोड(पुर्व), जिल्‍हा ठाणे, हे डेव्‍हलप करायला घेतली होत‍ी. त्‍याची परवानगी गव्‍हरमेंट ऑफ महाराष्‍ट्र अन्‍डर अर्बन लॅन्‍ड सिलींग अन्‍ड रेग्‍युलेश अक्‍ट 1976 प्रमाणे मिळाली होती. तक्रारदार सोसायटीने विरुध्‍द पक्षकार यांना इन्‍डेक्‍स 2 चे रु.45, 000/- खर्च करुन काढुन दिले होते. पण तरीही अद्यापी अनेकदा मागणी करुनही OC व CC व सदर सोसायटीच्‍या जागेचा कन्‍व्‍हेयन्‍स करुन दिलेला नाही. त्‍याची मागणी तक्रारदारांनी नुकसान भरपाई सकट केली आहे

3. मंचाच्‍या मते विरुध्‍द पक्षकार यांनी OC, CC, व कन्‍व्‍हेयन्‍स करुन देणे हि त्‍यांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. मंचाने नोटिस बजावुनही विरुध्‍द पक्षकार हजर राहिले नाहीत व त्‍याची लेखी कैफीयत त्‍यांनी दाखल केली

.. 2 ..

नाही म्‍हणुन मंचाने दि.24/08 रोजी विरुध्‍द पक्षकार विरुध्‍द एकतर्फा आदेश पारित केला. हे मंच पुढील प्रमाणे एकतर्फा अंतीम आदेश देत आहे.

अंतीम आदेश

1.तक्रार क्र. 308 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे. विरुध्‍द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.1‍, 000/-(रु. एक हजार फक्‍त) तक्रारदार यांस द्यावा.

2.विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदार सोसायटी गौरव एन्‍क्‍लेव्‍ह याच्‍या नावे कन्‍व्‍हेयन्‍स व OC, CC करुन देणे या आदेशाची अमलबजावनी या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 2 महिन्‍यांच्‍या आत करावे.

3.विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारदार सोसायटीस मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 20, 000/-(रु. वीस हजार फक्‍त) द्यावे.

4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍‍यात यावी.

5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्‍यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्‍वरित परत घ्‍याव्‍‍यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.

दिनांक – 02/02

ठिकान - ठाणे

(सौ.भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट )

प्र.अध्‍यक्षा सदस्‍य

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे


Company: Ravi Group

Country: India

Category: Real Estate

0 comments

Information
Only registered users can leave comments.
Please Register on our website, it will take a few seconds.




Quick Registration via social networks:
Login with FacebookLogin with Google